
शासनाकडून देयके थकल्याने कंत्राटदारांवर आर्थिक संकट, अभियंता संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
गेल्या ८ महिन्यांपासून शासनाकडून देयके थकविल्याने राज्यातील विकासकामे करणार्या कंत्राटदारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी राज्य अभियंता संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्यभर जिल्हास्तरावर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. रत्नागिरीत पावसाचे कारण देत धरणे आंदोलन रद्द करून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंपदा आणि जलसंधारण यांसारख्या अनेक महत्वाच्या विभागांची कामे करणारे कंत्राटदार, ज्यांना ’अभियंता’ म्हणूनही संबोधले जाते, त्यांची कोट्यवधी रुपयांची देयके शासनाकडे थकित आहेत.
’शासनाने अद्याप एकही पैसा दिलेला नाही’, असे या कंत्राटदारांनी सांगितले. यामुळे केवळ देयकेच अडकली नाहीत तर कामांसाठी लागणारी अनामत रक्कम, अतिरिक्त रक्कम आणि इतर निधीही परत मिळत नाही. निधीच्या अभावामुळे नवीन कामे बंद पडली आहेते. ज्यामुळे अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




