संगमेश्वर बाजारपेठेत उभ्या असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी
संगमेश्वर बाजारपेठेत उभ्या असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अस्ताव्यस्त वाहने उभी ठेवून वाहतूक कोंडी करणार्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.संगमेश्वर बाजारपेठ ही मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परंतु या बजारपेठेमध्ये मोठ्या वाहनांसह छोटी वाहने अस्ताव्यस्त लावलेली असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ग्राहकांना, पादचारी वर्गाना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागते. त्यामुळे अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्या वाहन चालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. www.konkantoday.com