
राजापूर तालुक्यातील जुवाठीत बिबट्या घुसला चक्क घरात
राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे बिबट्याने एका शेतकर्याच्या जनावराला ठार मारले असतानाच बिबट्या चक्क घरात घुसल्याची तक्रार घडली. यामुळे जंगल परिसरासह लोकवस्तीत मुक्तपणे संचार करणार्या बिबट्याची जुवाठी परिसरात दशहत निर्माण झाली आहे.जुवाठी येथील सचिन गोवळकर या शेतकर्याचा पाडा बिबट्याने मारल्याची घटना नुकतीच घडली. पंचायत समितीचे माजी सदस्य दिवाकर मयेकर यांची महिन्यापूर्वी पाडी मारली तर नुकतेच वाड्यात घुसून पाडा पकडला. सचिन गोवळकर व दिवाकर मयेकर यांचे मोठे नुकसान झाले. आता तर येथील प्रकाश वाघरे यांच्या घरामध्ये चक्क बिबट्या घरात घुसल्याची घटना घडली.www.konkantoday.com