रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी येथे कार व दुचाकी धडकेत दोन जण जखमी

रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी येथे कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना शुक्रवारी १ सकाळी आठच्या सुमारास काजरघाटी येथील वळणावर घडली.दशरथ गणपत बाणे असे संशयिताचे नाव आहे. संशयित बाणे हा आपल्या ताब्यातील कार (एमएच-४६ एक्स ८३१३) घेऊन हरचेरीहून रत्नागिरीकडे येत असताना काजरघाटीतील खालच्या वळणावर वाहन निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकी (एमएच-०८ बीबी ०१३८) ला धडक दिली. या अपघातामध्ये अफसाना साहिल मुल्ला (२७) व दुचाकीच्या मागे बसलेले त्यांचे वडिल खालीद उमर होडेकर ( ५४ रा. सोमेश्वर मोहल्ला, रत्नागिरी ) यांच्या लहान मोठ्या दुखापतीस कारणीभूत झाला. तसेच अपघाताची खबर न देताच निघून गेला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button