
मुंबई, पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली
मुंबई, पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने होळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यात नव्याने जाहीर केलेल्या आठ गाड्यांमध्ये चिपळूणपर्यंत धावणाऱ्या व सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या मेमू स्पेशल लोकल गाडीचाही समावेश आहे.२५ मार्च २०२४ रोजी धूलिवंदन अर्थात होळी सणातील मुख्य दिवस आहे. कोकणात होळीला मोठे महत्त्व असल्याने या कालावधीत रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात. कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणांहून होळीसाठी यापूर्वी काही गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता आणखी आठ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. रोहा ते चिपळूण (०१५९७/०१५९८) या मेमू लोकल ट्रेनचाही समावेश आहे. या गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. रोहा येथून ही गाडी ८ मार्चपासूनच सुरूझाली आहे. .३० मार्च २०२४ पर्यंत मेमू लोकल ट्रेन रोहा ते चिपळूण मार्गावर एकूण २२ फेऱ्या करणार आहे. रोहा येथून ही गाडी ११ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १.३० वाजता ती चिपळूण स्थानकावर पोहोचेल. चिपळूण येथून ही गाडी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी रोह्याला पोहोचेल.आठ डब्यांची ही अनारक्षित गाडी रोहा येथून पुढे दिव्यापर्यंत नियमितपणे चालवली जात असल्याने चिपळूण येथून या गाडीने दिव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. याचबरोबर चिपळूणला येण्यासाठी ही गाडी रोहा येथून सुटण्याआधी सकाळी दिव्यावरून सुटत असल्याने चिपळूणला येताना देखील रोहा- चिपळूण असा मेमू लोकलने दिवा येथून चिपळूणपर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरसोडण्यात येणाऱ्या आठ होळी विशेष गाड्या खालील प्रमाणे१) लो. टिळक टर्मिनस-थीवी – लो. टिळक टर्मिनससाप्ताहिक विशेष (०११८७/०११८८)२) पुणे – सावंतवाडी – पुणे ( ०१४४१।०१४४२) साप्ताहिक३) सावंतवाडी रोड पनवेल – सावंतवाडी (०१४४४/०१४४३) साप्ताहिक ४) लो. टिळक टर्मिनस- थीवी – लो. टिळक टर्मिनस (०११०७/०११०८)५ थीवी – पनवेल – थीवी (०१११०/०११०९) साप्ताहिक विशेष. ६) पुणे थीवी पुणे (०१४४५/०१४४६) साप्ताहिक.७) थीवी – पनवेल (०१४४८/०१४४७) साप्ताहिक. ८) रोहा-चिपळूण-रोहा मेमू स्पेशल (०१५९७/०१५९८ / ०१४४७) या गाड्याचा समावेश आहेwww.konkantoday.com