
भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील मेळाव्यात त्यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर झाले
__चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचा सुरुवात झाली भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच आजच्या मेळाव्याचं कारण सांगितलं. यावेळी, एका कार्यकर्त्याच्या मेसेजचा संदर्भ देत भास्कर जाधवांना जीवे माऱण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचं विक्रांत जाधव यांनी म्हटलं. एक वेळचा आमदार वाट्टेल ते बोलत आहे. त्यामुळे, आज लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येण्याचा निर्धार करायचा आहे. भास्कर जाधव हे एवढे हलके नाहीत की, कोणाच्या धक्क्याने ते पडतील. पण, त्यांनी भल्या भल्यांना धक्के देऊन पाडलं आहे. मी भास्कर जाधवांचा मुलगा आहे, जेव्हा तुमच्यावर एखादी वेळ येईल, तेव्हा छातीचा कोट करुन मी सर्वात अगोदर तुमच्यापुढे असेल, असा विश्वास माझ्या तरुण मित्रांना मी देतो, असे विक्रांत जाधव यांनी म्हटले. त्यावेळी, भास्कर जाधवांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. वडिलांसाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना विक्रांत जाधव यांनी केलं.www.konkantoday.com