बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा मधील डॉक्टरला अटक
क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातील फरार संशयित डॉ. विजय गोपाळ नारकर (वय 63, रा. साखरपा, ता. देवरूख, जि. रत्नागिरी) यास करवीर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.याप्रकरणी अटक झालेल्या संशयिताची संख्या नऊ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. करवीर पोलिसांनी संशयिताच्या दवाखान्यातून गर्भपाताच्या औषधाचा साठा हस्तगत केला आहे. न्यायालयाने त्यास सोमवारी ( दि. 12 पोलिस कोठडी दिली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आरोग्य व करवीर पोलिसांनी जानेवारी महिन्यात क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे छापा टाकून कारवाई केली होती. त्यात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताचा भांडाफोड झाला होता. कारवाईनंतर निष्पन्न झालेल्या आठ संशयितांना अटक झाली होती.कोल्हापूर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील एका घरात छापा टाकून कारवाई केली होती. त्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड झाला. त्या गुन्ह्यात एका अधिकृत डॉक्टरसह एक बोगस डॉक्टर, टेक्निशिअन आणि एजंट अशा आठ संशयितांना अटक झाली होती. त्यांच्या चौकशीत साखरपा येथील डॉ. विजय नारकर यांचे नाव समोर आले होते. डॉ. नारकर यांचे नाव निष्पन्न झाल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीwww.konkantoday.com