पुण्यातील नृत्यचक्रमध्ये चिपळूणच्या ३५ नर्तकींचा सहभाग
पुणे मुकुंदनगरमधील चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर नृत्यचक्र हा कथ्थक नृत्यावर आधारित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात संपूर्ण राज्यभरातून तब्बल २० शहरातील सुमारे १२०० कथ्थक नर्तकांनी सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने कथ्थक नृत्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये होणार आहे. या कार्यक्रमास चिपळूण येथील नृत्य मल्हार कथ्थक अकादमीच्या ३५ नर्तकांनी सक्रीय सहभाग दर्शविला.या समुहाचे नेतृत्व नृत्य मल्हार अकादमीच्या संस्थापिका तसेच संचालिका नृत्यालंकार आर्या (स्कंध) चितळे यांनी केले. २० मिनिटांच्या सादरीकरणासोबतच शहरानुरूप ३ मिनिटांच्या नृत्याचे सादरीकरण दिग्गज कलाकारांसमोर करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या समुहाला मिळाली. www.konkantoday.com