
डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते अशोकराव कदम यांचा सत्कार
महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अशोकराव कदम यांचा रत्नागिरी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच पुणे येथे झाला. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळामधून अध्यक्षपदी संजीव पुसाळकर तर चिपळुणमधील सहकारातील नेते अशोकराव कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांच्या हस्ते अशोकराव कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. www.konkantoday.com