चिपळूण तालुका कॉंग्रेस पक्षाला अद्याप नवीन तालुकाध्यक्ष मिळाला नाही.
चिपळूण तालुकाध्यक्षाविना
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. अशा परिस्थितीत चिपळूण तालुका कॉंग्रेस पक्षाला अद्याप नवीन तालुकाध्यक्ष मिळालेला नाही. तालुका नेतृत्वच नसल्याने पक्षाचे काम करणार तरी कसे, असा पेच आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे काहीजण पर्याय शोधत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रमुख महिला पदाधिकार्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भविष्यात अशीच आऊटगोईंग सुरू राहिल्यास पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रसेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर तालुकाध्यक्ष पदाचा तिढा सोडवावा आणि तालुक्याला ताकदवान नेतृत्व द्यावे, अशी मागणी आता कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. www.konkantoday.com