चिपळुणातून लोखंडी साहित्य चोरीस

बांधकाम व्यवसायासाठी लागणारे ९० हजारांचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २ ते ४ मार्च या कालावधीत लाईफ केअर हॉस्पिटल शेजारी असणार्‍या नासीर खोत यांच्या बिल्डींक कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद जावेद अब्दुल गणी पोशरकर यांनी दिली. या लोखंडी साहित्यात ६ हजार किंमतीचे १०५ किलो वजनाच्या लोखंडी सळ्या, ३ हजार रुपये किंमतीच्या ५० किलो वजनाच्या कॉलमसाठी लागणार्‍या लोखंडी चौकोनी रिंग असे ९० हजार रुपये किंमतीच्या लोखंडी साहित्याचा समावेश होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button