
स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब,भाजपा कुवारबाव व माजी आमदार बाळासाहेब माने यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा
स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब,भाजपा कुवारबाव व माजी आमदार बाळासाहेब माने यांचे संयुक्त विद्यमाने दि.८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने दुपारी भाजपा कार्यालय येथे पाक कला स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये१)सौ.श्रावणी संतोष मयेकर २)सौ.साक्षी सम्राट पाटील ३)सौ.प्रज्ञा प्रकाश चव्हाण यांनी विजय प्राप्त केला.संध्याकाळी हळदीकुंकू व त्यानंतर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाप्रसंगी तीन महिलांचा सत्कार करण्यात आला यामधे १) गीता जगदीश सकपाळ (हॉटेल व्यावसायिक) २)अरवा समीर नाचणकर(राज्यस्तरीय फुटबॉलपटू)३) रविना रविंद्र चाळके(जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत सफाई कर्मचारी).त्याच बरोबर गावातील आशा सेविका,बचतगट सीआरपी यांचे कार्याचा गौरव करण्यात आला.खेळ पैठणीचा मधे सौ.प्राची दत्तात्रय मासाल या विजयी ठरल्या तर प्रमोद ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेला चांदीचा कुंकुवाचा करंडा सौ.गार्गी गणेश सुर्वे यांनी पटकावला.या कार्यक्रमाप्रसंगी नुपूर पाष्टे यांनी महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.बक्षीस वितरण प्रसंगी प्रास्ताविक प्रभाकर खानविलकर ,क्लब अध्यक्ष सतेज नलावडे व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुश्री आपटे,प्रियल जोशी,राखी केळकर,विक्रांती केळकर,नेहा आपकरे,आस्था गराटे,शिवान्या गराटे व क्लब चे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला सौ.माधवीताई माने,सरपंच सौ.मंजिरी पाडळकर,भाजपा मंडल अध्यक्ष दादा दळी,सरचिटणीस ओंकार फडके,नाचणे ग्रामपंचायत सदस्या सौ.दीप्ती फडके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बावाशेठ नाचणकर उपस्थित होते.www.konkantoday.com




