राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होणार
_आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com