रत्नागिरी तालुका मच्छी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी तालुका मच्छी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज भावी खासदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी – जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज हा प्रवेश संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी तालुका मच्छी वाहतूक संघटनेच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा शब्द यावेळेस किरण सामंत यांनी या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. किरण सामंत यांची कामाची पद्धत आणि कामाची गती पाहून समाजामध्ये आणि परिसरातील अनेक लोकांचे विकास कामे होण्याच्या उद्देशाने आम्ही किरण सामंत आणि उदय सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे यावेळेस या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितले. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही शिवसेने सोबत म्हणजेच पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत असल्याची गवाही यावेळेस या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळेसअध्यक्ष निखिल लांजेकर,उपाध्यक्ष योगेश चव्हाण, वैभव सावंत देसाई,प्रकाश साळवी, दिगंबर मयेकर, आशिष वांदरकर,दत्तगुरु किर, विराज शिवलकर, सूरज गार्डी, मनोज मोड, अस्लम मदभावी, रुपेश पाटील,राहुल मयेकर, विशाल कांबळे,रोहित पालव,आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com