
महाराष्ट्रात भाजपच्या तब्बल 12 खासदारांचं तिकीट कापलं जाणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे.स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.तिकीट का कापलं जाऊ शकतं?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?प्रीतम मुंडे, बीडसुभाष भामरे, धुळेसिद्धेश्वर स्वामी, सोलापूर संजय काका पाटील, सांगलीसुधाकर श्रृंगारे, लातूरउन्मेश पाटील, जळगावगोपाळ शेट्टी, उत्तर मुंबईपुनम महाजन, उत्तर मध्य मुंबईप्रताप चिखलीकर, नांदेडसुजय विखे पाटील, अहमदनगररामदास तडस, वर्धारक्षा खडसे, रावेरwww.konkantoday.com