मध्य रेल्वेचा होळीनिमित्त पुण्यामधून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय
मध्य रेल्वेने पुण्यामधून होळीनिमित्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. होळीच्या सणाला होणारी वाहतूक कमी व्हावी आणि प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते. त्यामुळे अनेक लोक होळीसाठी आपापल्या गावी परत जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुणे-सावंतवाडी-पुणेगाडी क्रमांक 01445, सावंतवाडी विशेष गाडी 8 मार्च 2024, 15 मार्च 2024, 22 मार्च 2024 आणि 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9:35 वाजता पुण्याहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 23:30 वाजता सावंतवाडीला पोहोचेल.गाडी क्रमांक 01446, पुणे विशेष गाडी सावंतवाडीहून 10 मार्च, 17 मार्च , 24 मार्च आणि 31 मार्च 2024 रोजी दुपारी 23.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:15वाजता पुण्याला पोहोचेल.ही गाडी कल्याण, लोणावळा, पनवेल रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली आणि कुडाळ येथे थांबेल.पुणे-थिविम-पुणे01441, पुणे-थिविम विशेष गाडी 12 मार्च, 19 मार्च आणि 26 मार्च रोजी पुण्याहून9:35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:30 वाजता थिविमला पोहोचेल.गाडी क्रमांक 01442, थिविम-पुणे विशेष गाडी 12 मार्च , 20 मार्च आणि 27 मार्च रोजी थिविमहून 23:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:15 वाजता पुण्याला पोहोचेल.ही गाडी कल्याण, लोणावळा, पनवेल रोहा, खेड, चिपळूण, माणगाव, सरवाडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वैभववाडी रोड, कणकवली येथे थांबेल.www.konkantoday.com