पैशासाठी आता लोकांच्या जीवाशी खेळ,1 कोटींहून अधिक किंमतीची बनावट औषधं जप्त
_आजारातून बरं होण्यासाठी औषधं अत्यंत आवश्यक असतात. सगळे जण अत्यंत आशेने आणि निर्धास्तपणे ही औषधं घेत असतात; मात्र ही औषधंच बनावट असली तर? अशी औषधं खाल्ली गेली, तर बरं होणं तर दूरच, उलट जिवाला धोकाच निर्माण होऊ शकतो.दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्ये बनावट औषधं तयार करणाऱ्या दोन फॅक्टरीजचं पितळ उघडं पडलं आहे. या फॅक्टरीजमधून ब्लड प्रेशर आणि शुगरवरची एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची बनावट औषधं जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.देशात उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपीचे 22 कोटी, तर डायबेटीसचे सुमारे 10 कोटी रुग्ण आहेत. त्यामुळे या विकारांवरच्या औषधांचा खप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळेच आरोपींनी या विकारांवरच्या बनावट औषधांच्या निर्मितीतून स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायचं ठरवलं. जप्त करण्यात आलेल्या बनावट औषधांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गाझियाबाद पोलीस आणि क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत एक कोटी 10 रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आलाwww.konkantoday.com