पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात २८६ विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार
_कोकणात मुसळधार पाऊस कोसळूनही कोकण परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायम राहिला आहे पावसाचे फुकट जाणारे पाणी बंधारे उभे करून पाणी अडवण्याऐवजी इंधन विहिरी खोदण्यावर भर दिला जात आहे एकीकडे जमिनीतील पाण्याची पातळी खाली जात असतानाच आताउन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात २८६ विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार आहे.त्यासाठी ३ कोटी १४ लाख ८६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही जमिनीवाटे पाणी नदीनाल्यातून वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सुमारे ३०० ते ४०० वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात. त्यामध्ये यंदाही जिल्ह्यातील १५२ गावांतील २८६ वाड्यांमध्ये प्रत्येकी एक अशा २८६ विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार आहे. सर्वच ठिकाणी विहीर खोदाई करणे न परवडणारे आहे. त्यामुळे विंधन विहिरीचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. हे टाळण्यासाठी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार आहे. विहिरींपेक्षा विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. त्यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरींची खोदाई करण्यात येणार आहे; मात्र, अनेकदा विंधन विहिरींना पाणीही लागत नाही. त्यामुळे खोदाई करण्याचा खर्च वाया जातो. २०२३च्या टंचाई आराखड्यामध्ये १२७ गावांमधील २५५ वाड्यांमध्ये विंधन विहिरींची खोदाई करण्यात आली होती. त्यावर २ कोटी ६१ लाख ९० हजार रुपये खर्च करण्यात आला होता.www.konkantoday.com