जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण -जिल्ह्यातील विकास कामांसाठी ३ हजार ३४१ कोटी रुपयांची कामे सुरू
सिंधुदुर्गनगरी -) विविध विकासकामे आणि प्रकल्प राबवून जिल्ह्याच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. शासनाने सुमारे ३ हजार ३४१ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी एकूण ४ हजार ५९१ कोटी एवढा निधी खर्च करून विविध विकास कामे केली जात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या 29 कामांचा व मुख्यमंत्री सडक योजनेतील 52 रस्त्यांचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विकास समिती कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. आपल्या राज्याची देखील विकासाकडे घोडदौड सुरू आहे.कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात 209 कामे व 850 कोटी ,कुडाळ मतदार संघात 119 कामे व 657 कोटी सावंतवाडी मध्ये 255 कामे व 668 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्याशिवाय अकराशे कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामावर खर्च होत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणखी बळकट करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. काजूला अनुदान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.*विविध विकासकामांचे ऑनलाईन शुभारंभ* शासकिय विश्रामगृह फोंडा इमारतीची विशेष दुरुस्ती करणे, वेंगुर्ला तालक्यातील शासकिय विश्रामगृह इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल तिर्लोट नवानगर रस्ता मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी बेळगाव रस्ता सुधारणा करने, बांदा शेर्ला डोणकळ रस्ता लहान पुलाचे बांधकाम, शिरोडा तिठा ते रेडी तेरेखोल (गोवा हदद) रस्ता मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता सुधारणा व लहान पुलाचे बांधकाम करणे, कुडाळ तालुक्यातील कनेडी कुपवडे कडावल नारुर वाडोस शिवापुर शिरशिंगे रस्ता पुलाचे (दुकानवाड पुल) बांधकाम करणे, दोडामार्ग तालुक्यातील सासोली कुडासे साटेली रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, दोडामार्ग तालुक्यातील भेडशी बोडदे खोक्रल मांगेली ते कर्नाटक हद्दीकडे जाणारा रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे, दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापुर नागनवाडी चंदगढ रामघाट दोडामार्ग अस्नोंडा रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे, भेडशी पिकुळे रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे, आचरा (बंदर) वरवडे हरकुळ फोंडा उंबर्डे रस्ता पुलाची पुर्नबांधणी करणे, कणकवली तालुक्यातील बीडवाडी पिसेकामते रस्ता कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे, वैभववाडी तालुक्यातील जांभवडे बौद्धवाडी रस्ता ग्रा. मा १७ वर नवीन पुलाचे बांधकाम करणे, दाभोळे नारिंग्रे पोयरे रस्ता पुलाची पुर्नबांधणी करणे, ओरोस सावंतवाडा येथे ग्रा. मा. ८२ येथे कॉजवेच्या जागी उंच पातळीचा पूल बांधणे, रानबांबुळी आरोस वर्दे कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे रानबांबुळी आरोस वर्दे कॉजवेच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणे, रेडी येथील देवी माऊली मंदिर परिसरात बहुदेशीय सभागृह व अन्नछत्र बांधणे, रेडी येथील देवी माऊली मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे व परिसर सुशोभिकरण करणे, आंबोली विश्रामगृहाचे बांधकाम, बांदा येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे विस्तारीकरण, कुडाळ विश्राम गोवा दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे सावंतवाडी तालुक्यातील कनेडी कुपवडे शिवापुर शिरशिंगे सांगेली दाणोली बांदा सुधारणा करणे, सावंतवाडी तालुक्यातील नेमळे बादे तळवडे रस्ता व पुलाचे बांधकाम, आचरा कणकवली रस्ता रूंदीकरण व काँक्रीटीकरण या कामांचा ऑनलाइन शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. *सिंधुनगरीसाठी 32 कोटी* सिंधुनगरी या मुख्यालय शहराच्या विकासासाठी तब्बल 32 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे व या शहराला विकासात्मक गती दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले. सिंधू नगरीतील 15 किलोमीटर लांबीचे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शहरातील सर्व रस्ते डागडुजी होऊन सुस्थितीत होतील असा निर्वाळाही त्यांनी दिला. सिंधुनगरी सुशोभीकरण अत्यावश्यक सुविधा, शिवछत्रपतींचा पुतळा, प्रवेशद्वार व शहर अंतर्गत विकास कामे यावर हा निधी खर्च होणार आहे त्यामुळे शहरवासीयांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंगणेवाडीसाठी आठ कोटी रुपयांचा निधीही आपण उपलब्ध करून दिला यात्रा स्थळाला विशेष दर्जा दिल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com