
खेडमध्ये खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणार्या तिघांवर गुन्हा.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत कंपनीतील रसायन बेकायदेशीरपणे उघड्यावर टाकल्याबाबतची येथील तहसील कार्यालयातील तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागत त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ही घटना फेब्रुवारी २०२५ ते १० एप्रिल या कालावधीत बोरज येथील गट क्रमांक ७०७ येथे घडल्याचे विशाल विवेक घोसाळकर (३८, बोरज-घोसाळकरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.परेश उदय शिंदे, सुरज सुरेंद्र पड्याळ (दोघे रा. बोरज-खेड), सुरज दिलखुष तांबे (निगडे-खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण एमएच ०८ बीसी २२६६ क्रमांकाच्या कारने बोरज येथील गट क्रमांक ७०७ येथे आले. या दरम्यान तिघांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मुंबई, पुणे येथे गैंग असून एक गैंग बोलावली तर ठार करू, असेही धमकावले.तसेच उघड्यावर टाकलेल्या कंपनीतील रसायनाबाबत तहसील कार्यालयात दाखल केलेली तक्रार १० लाख रुपये दिल्यान मागे घेतो, अशी खंडणी मागत दरमहा १० हजार रुपये देण्याची मागणी केली. मागणी केलेल्या १० लाख रुपयांपैकी १ लाख रुपये ातिघांनी स्वीकारल्याचे घोसाळकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.www.konkantoday.com