केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षासीटीईटी’ची तारीख जाहीरअर्ज प्रक्रियाही सुरू
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) घेण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेची घोषणा सीबीएसईकडून कधी करण्यात येणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. या परीक्षेची तारीख आणि नोंदणीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार देशभरात सीटीईटी ७ जुलैला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २ एप्रिल ही अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. केंद्रीय स्तरावर सीबीएसईकडून सीटीईटी आयोजित केली जाते. त्यानुसार ३ जुलैला होणारी सीटीईटी ही १९वी परीक्षा असून, देशभरातील १३६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी २० भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. पेपर एक सकाळी साडेनऊ ते बारा, तर पेपर २ दुपारी साडेचार या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा आणि नोंदणीबाबतची अधिक माहिती
https://ctet.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले.
www.konkantoday.com