आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहेत.नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याचा निमित्ताने राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेची राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी 7 मार्च रोजी नाशिक शहरात दाखल झाले आहेत.यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून जवळपास 5 हजार मनसैनिक तसेच पदाधिकारी दादासाहेब गायकवाड सभागृहात बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील वाटचाल आणि दिशा याबाबत राज ठाकरेमनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. www.konkantoday.com