झाडांचा पाला पाचोळा गोळा करून पेटविण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावत असताना*,*खेड आगारात आग… भीषण प्रसंग टळला
खेड येथील राज्य परिवहन आगारातील मोकळ्या जागेत पडलेला झाडांचा पाला पाचोळा गोळा करून पेटविण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावत असताना, पालापाचोळा तापलेल्या उन्हात पेटल्यामुळे आग भडकून उपप्रादेशिक परिवहन विभागाने पकडलेली अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती , मात्र खेड नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रातील जवानांनी वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.येथील आगाराच्या मोकळ्या जागेत आरटीओ विभागाकडून कारवाई केलेली वाहने जप्त करून ठेवली जात असतात. याठिकाणी असणाऱ्या झाडांचा सुका पालापाचोळा एकत्र करून ते पेटवून सफाई कर्मचारी कचरा गोळा करत असताना उन्हामुळे आगीने पेट घेत आग जवळच असणाऱ्या झाडांना लागून शेजारी असलेल्या जेसीबीच्या टायरजवळ जाऊन पोहोचली , ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सर्व यांत्रिक विभागातील कर्मचारी, ऑफिसमधील कर्मचारी यांनी बादलीने पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला .मात्र, आग आटोक्यात येत नव्हती .आगारातील १० फायर इस्तुगेशर फोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी खेड नगरपालिकेचा अग्निशमन केंद्रातील जवान फायरमन दीपक देवळेकर, शाम देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, चालक विद्याधन पवार यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे कार्य पूर्ण केले. अन्यथा याठिकाणी ठेवण्यात आलेल्या अन्य वाहनांना आग लागून मोठी हानी झाली असतीwww.konkantoday.com