हिंदू बंजारा सेवा संघाचा रत्नागिरीत उद्योग मेळावा
रत्नागिरी जिल्ह्यातील बंजारा समाजातील लोक बहुसंख्येने कामानिमित्त खेडोपाडी विखुरलेले आहेत. प्रचंड कष्ट करण्याची ताकत समाजातील लोकांमध्ये आहे. वर्षोनुवर्षे समाजातील लोकांची भटकंती सुरू असून, अनेक वर्षांपासून कष्ट करत आलेल्या बंजारा समाजाला स्थिरता मिळवून उद्योगधंद्याकडे वळवण्यासाठी हिंदू बंजारा सेवा संघाच्यावतीने उद्योग मेळावा रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक पतपेढीच्या सभागृहात घेण्यात आला.सुरवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेच्यावतीने तसेच अध्यक्ष राजूशेठ राठोड यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रत्नागिरी उद्योगकेंद्राचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांचा सत्कार केला. मेळाव्यासाठी जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी रत्नागिरी उद्योगकेंद्रात अनेक योजनांचा फायदा बंजारा समाजातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाचे मार्गदर्शक मोतिराम राठोड, अनंत राठोड, रामू चव्हाण, अनिल राठोड, राजू राठोड, राकेश पवार आदींनी मेहनत घेतली. बंजारा समाजातील मुकादम, ठेकेदार स्त्री-पुरुष बहुसंख्येने उद्योग मेळाव्यासाठी उपस्थित होते.www.konkantoday.com