सामाईक घराचे वाटप करण्याच्या वादातून आपापसांत २ गटात वाद,परस्परविरोधी तक्रारी दाखल दोन्ही गटातील ७ जणांवर गुन्हे दाखल
खेड तालुक्यातील शिवखुर्द पाटीलवाडी येथे सामाईक घराचे वाटप करण्याच्या वादातून आपापसांत २ गटात वाद झाल्याची घटना ५ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका गटातील गणपत विश्राम डफळे (रा. शिवखुर्द) यांनी तक्रार दिल्यानुसार संशयित अमोल विलास डफळे, विलास विश्राम डफळे व २ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीत त्यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण करून गणपत विश्राम डफळे, तेजस गणपत डफळे, गितेश गणपत डफळे व अलका गणपत डफळे (सर्व रा. शिवखुर्द श्रीरामवाडी, ता. खेड) यांना जखमी केल्याचे नमूद करण्यात आले दुसर्या गटातील विलास विश्राम डफळे (रा. शिवखुर्द, ता .खेड) यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून गणपत विश्राम डफळे व अन्य २ जणांनी शिवीगाळ व दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. या मारहाणीत फिर्यादीसह अमोल विलास डफळे (वय २८) हे दोघे जखमी झाले आहेत, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेwww.konkantoday.com