रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार बालकांचे पोलिओ लसीकरण

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार बालकांचे पोलिओ लसीकरण झाले.या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील ६७ हजार ४०४ मुला-मुलींना व ५ वर्षांवरील १ हजार ५९ मुला-मुलींना असे एकूण ६८ हजार ४६३ मुला-मुलींना या लसीची मात्रा देण्यात आली.प्रत्येक तालुक्यातील गावे, वाड्यावस्त्यांमध्ये १६७० पोलिओ बूथ पोलिओ लसीकरणासाठी कार्यरत होते. त्यामध्ये २०५ मोबाईल टीम, ३२ ट्रान्जिट टीम, १२९ वैद्यकीय अधिकारी, ३५२ सुपरवायझर, ३७ जिल्हास्तरीय अधिकारी व सुपरवायझरमार्फत काम केले. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी पुरेसा लससाठा, स्टेशनरी साहित्य तसेच जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्स उपलब्ध करून देण्यात आले होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button