
इनरव्हील क्लब ऑफ, रत्नागिरी मिडटावून चे अध्यक्षपदी ऋचा गांधी, सेक्रेटरी सुवर्णा चौधरी, खजिनदार श्रद्धा सावंत , एडिटर मंजिरी पाडळकर, आयएसओ डॉक्टर प्रियांका कांबळे यांची निवड.
इनरव्हील क्लब रत्नागिरी मिडटावुन चा पदग्रहण सोहळा हॉटेल संगम रेसिडेन्सी येथे पार पडला. या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीन अशोक नाईक हे उपस्थित होते. ते रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे सन 27- 28 चे गव्हर्नर असणार आहेत.
या वेळेला रोटरी क्लब रत्नागिरी मिडटावून चाही पदग्रहण सोहळा पार पडला.
अध्यक्ष डॉक्टर स्वप्ना करे. सेक्रेटरी रोटे. राजेंद्र कदम व खजिनदार म्हणून रोटे. सिताराम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळेला इनर्व्हील तर्फे सामाजिक कार्यकर्त्या व चिपळूण येथील नारी सन्मान प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ प्रियांका कारेकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सुप्रिया लाड, गांधी या दिव्यांग मुले यांच्यासाठी स्पर्श फॉर हेल्प या माध्यमातून काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी तर्फे कोकण मॅरेथॉनचे संचालक प्रसाद देवस्थळी तसेच पत्रकार राजन चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या व रोटरी सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय पाथरे हेही उपस्थित होते.
आभार प्रदर्शन इनरव्हील तर्फे सेक्रेटरी सुवर्णा चौधरी यांनी केले तसेच रोटरी तर्फे राजेंद्र कदम यांनी केले.