
जि.प. पं. स. सदस्य असो.च्या जिल्हाध्यक्षपदी रोहन बने
रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांनी श्री. बने यांचे नाव जाहीर केले. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष उदय बने यांच्यासह इतर सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. रोहन बने यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नुकतेच भुषविले होते. कोरोना कालावधीमध्ये प्रशासनाशी समन्वय साधत चांगल्या पद्धतीने कामकाज चालविले होते.
www.konkantoday.com