महायुतीच्या मर्यादा…’, फडणवीसांनंतर मुनगंटीवारांनी रामदास कदमांचे टोचले कान
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सूरू असताना, ‘भाजपने आमचा केसाने गळा कापू नये’ असं विधान शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी करून भाजपवर टीका केली होती.टीकेवर आता देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता ‘महायुतीच्या मर्यादेत राहूनच मत मांडा’, अशा शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शिंदे गटाचे आमदार रामदास कदमांना सुनावलं आहेसुधीर मुनगंटीवार प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रामदास कदमांच्या विधानावर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्याही नेत्यांनी आपले मत, भाष्य मांडताना ज्या महायुतीच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहूनच मांडले पाहिजे, असा शब्दात मुनगंटीवार कदमांना खडेबोल सुनावले आहेत. बारा लोकांची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये मीही एक सदस्य आहे. कोर टीमच्या सदस्यांमध्ये अशा विषयावरती चर्चा होते आपण जाहीर मध्ये एखादी चर्चा सुरू केली तर त्यावर दुसराही उत्तर देतो आणि मग थांबवणे कठीण होते, असे मुनगंटीवार म्हणाले आहेतwww.konkantoday.com