
पन्नास प्रकारची प्रदर्शन साहित्य विद्यार्थ्यांसाठी पाहण्याची सुविधा देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरने उपलब्ध करून दिले
रोबो कसा बनवला जातो याचे प्रात्यक्षिक, विविध कलाकृतींची थ्रीडी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या पन्नास प्रकारची प्रदर्शन साहित्य विद्यार्थ्यांसाठी पाहण्याची सुविधा देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये उपलब्ध करून दिले आहे. विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी कोकणातील पहिल्या बालविज्ञान केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सात कोटीचे प्रकल्प पाहता येणार आहेत.देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आधुनिक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता शोधण्याचे कसब निर्माण व्हावे, त्यांची वैज्ञानिक व तर्कशास्त्रीय विश्लेषण करण्याची क्षमता वाढावी व त्यामधून भविष्यकाळातील देशाचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ निर्माण व्हावेत या प्रमुख उद्देशाने हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, नेहरू सायन्स सेंटर आणि होमी भाभा विज्ञान शिक्षणसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास प्रकारचे विविध प्रयोग ठेवण्यात आले त्यामध्ये सध्या सर्वच मुलांसाठी आकर्षणाचा भाग असलेला रोबोटिक्स याची माहिती तिथे दिली गेली रोबो कसा बनवायचा, त्याचे प्रोग्रॅमिंग कसे करायचे, याची प्रात्यक्षिकासह सर्व माहिती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्किट कसे बनवायचे, त्याचा वापर कसा करावयाचे हे तिथे पाहायला मिळाले पन्नासहून अधिक प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्याwww.konkantoday.com