चिपळूण नगर परिषदेची थकबाकीदारांविरूद्ध १० मार्चनंतर धडक कारवाई
आर्थिक वर्ष संपत आल्याने चिपळूण नगर परिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवला आहे. आतापर्यंत ७ कोटी ७८ लाख ४५ हजार रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण ४५ टक्के असून अजून ५५ टक्के वसुली बाकी आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १० मार्चनंतर धडक कारवाई केली जाणार असून त्याची तयारी सध्या केली जात आहे. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे. www.konkantoday.com