
चिपळुणात गावठी दारू अड्ड्यांवर दुसर्या दिवशीही धाडसत्र सुरू
चिपळूण तालुक्यातील पालवण परिसरात खुल्या पद्धतीने सुरू असलेल्या दारू विक्रीवर महिलांसह पोलिसांनी संयुक्तपणे धडक देत ते उध्वस्त केल्याच्या घटनेनंतर सावर्डे पोलिसांनी मंगळवारी दुसर्या दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली आहे. यातूनच गावठी दारूविक्री करणार्या दोघांवर सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या दारू विक्रीप्रकरणी महिलांनीच फिर्याद दिली. संदेश लक्ष्मण पाले, उमेश विजय भंडारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.www.konkantoday.com