
‘आयएमए’ कडून ‘आशादीप’ ला गादी वाटप
रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. तोरल शिंदे आणि सहकाऱ्यांनी आशादीप या दिव्यांग मुलांच्या वसतिगृहात गादी वाटप केले.आशादीप ही संस्था मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ करते. येथील राहणाऱ्या मुलांना झोपण्यासाठी गाद्याची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नुकतेच त्यांचे वाटप करण्यात आले. तब्बल 25 गाद्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आशादीपला देण्यात आल्या.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. प्रज्ञा पोतदार, डॉ. निलेश शिंदे उपस्थित होते. यावेळी आशादीप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित मुलांनी आपलेपणाने सर्वं डॉक्टर्सचे स्वागत केले आणि आभार व्यक्त केले.www.konkantoday.com