लांजा तालुक्यातील तळवडे येथील निवेदिता आंबेकर हिने संगणक अभियंता अधिकारी क्लास 2 श्रेणीमध्ये पाचवे नामांकन प्राप्त करून यश संपादित केले

राज्य सेवा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून महाराष्ट नगर परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत लांजा तालुक्यातील तळवडे येथील कु. निवेदिता नंदकुमार आंबेकर हिने संगणक अभियंता अधिकारी क्लास 2 श्रेणीमध्ये पाचवे नामांकन प्राप्त करून यश संपादित केले आहे.निवेदिता आंबेकर ही सेवानिवृत्त लिपिक नंदकुमार आंबेकर आणि सेवानिवृत्त न्यायालयीन अधीक्षक सौ आंबेकर यांची ती कन्या आहे. लांजा हायस्कूलमध्ये खो खो खेळातील राज्यस्तरीय खेळाडू आहे. लांबउडी या क्रीडा प्रकारात तिने राज्यस्तरीय यश मिळवले होते. दहावी शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत जिल्हात प्रथम आली होती.एमपीएससी परीक्षेत तीने जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसुत्रीनेव प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. गेली ४-५ वर्षे MPSC राज्यसेवेसारख्या अनेक स्पर्धांना सामोरे जात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती देऊनही अपेक्षित यश हुलकावणी देत असताना देखील अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, मेहनत व संयम ठेवून निवेदिता ने अखेर यश खेचून आणलेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button