
योगेश कदम यांची स्थानिक भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले. त्यातच आता शिंदे गटातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम यांनीही स्थानिक भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महायुती असतानाही जर का आमचे कार्यकर्ते भाजपच फोडणार असेल, तर मलाही नाईलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील, असा थेट इशारा योगेश कदम यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप हा वाद समोर आला आहे.यावेळी रायगड लोकसभेत अनंत गीते यांनी दापोली मतदारसंघातून लीडची अपेक्षा सोडाच, पण महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी ५५ ते ६० हजारांचं मताधिक्य मिळून तो विजयी होईल असाही विश्वास आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केलाwww.konkantoday.com