मला या चिखलात दगड टाकायचा नव्हता. म्हणून मी शांत -अभिनेत्री प्राजक्ता माळी.

भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता माळी यांनी आपली बाजू मांडली आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या विधानाचा मी निषेध करते.गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरु आहे. तेव्हापासून मी अत्यंत शांततेने ट्रोलिंगला सामोरे जातेय. माझी शांतता म्हणजे मूकसंमती नाही. तर हतबलता आहे. एक व्यक्ती काहीतरी बरळून जाते. त्यावर हजारो व्हिडीओ बनतात.

एका सेलिब्रिटीला त्यावर बोलणं भाग पाडलं जातं. यावर प्रतिक्रिया येतात. महिलांची अब्रू निघत राहते आणि सर्वांच मनोरंजन होतं राहत. मला या चिखलात दगड टाकायचा नव्हता. म्हणून मी शांत राहिल्याचे प्राजक्ता यांनी म्हटले.एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला. ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितलं.

लोकप्रतिनीधी यावर टिपण्णी करतात. यांना लोकांनी निवडून दिलंय. हे आपल्यावर चिखलफेक करतात. पण काल सुरेश धस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं. लोकप्रतिनिधीला लाखो लोकं फॉलो करतात. एखादी गोष्ट खरी असल्याचे ते भासवतात, असे त्यांनी यावेळी म्हटले.तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही कलाकार आहोत. या सर्वात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा संबंध काय? महिला कलाकारांचीच नाव का येतात? पुरुष कलाकारांची नाव का येत नाहीत. कष्ट करुन नाव कमावणाऱ्या महिलांच्या नावाची बदनामी का करता.

त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नाव घेतली. कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, प्रेक्षकांचे मनोरंजन करणं हे कलाकारांचे काम आहे. मी याआधीही करत राहिले आणि पुढेही काम करतराहीनं, असे प्राजक्ता माळी यांनी यावेळी म्हटलं.महिला म्हणून ही बाब मला अतिशन निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शोभत नाही. सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, असे ती यावेळी म्हणाली. तसेच महिलांनी महिलांच्या पाठीशी उभं राहायला हवं, पुरुष प्रधान संस्कृतीत त्यांच्यावर शिंतोडे उडवायला नको, असे आवाहन प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button