तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी-धक्कादायक आरोप करुन चंद्राबाबू नायडू यांनी खळबळ उडवून दिली.

तिरुमलाच्या पवित्र लाडू प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जाते असा धक्कादायक आरोप करुन चंद्राबाबू नायडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. जगन मोहन यांच्या वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप नायडूंनी केलाय.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या लाडूंची चाचणी केली. यात लाडू भेसळयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.तिरुपती म्हणजे करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र. भगवान व्यंकटेश्वर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बालाजीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो लोकं येतात.. महाराष्ट्रातल्या भाविकांची संख्या तर प्रचंड असते.. भाविक बालाजीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेतात.. मात्र आता या लाडूच्या प्रसादावरुन आंध्र प्रदेशचं राजकारण चांगलंच तापलं आहे. वायएसआर काँग्रेस तसंच तिरुमला देवस्थानम ट्रस्टच्या माजी सदस्यांनीही चंद्राबाबू नायडूंचे आरोप फेटाळून लावले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button