
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीना न्याय मिळावा यासाठी आ. शेखर निकम यांची उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी
कोयना जलविद्युत प्रकल्प अंतर्गत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांची नुकतीच खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शेखर नियम यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी मागणी केली. या बैठकीला माजी पं. स. सदस्य रमेश राणे, मयुर खेतले व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. कोयना जलविद्युत प्रकल्पाला ६१ वर्षे पूर्ण होवूनही अद्याप प्र्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. महानिर्मितीने आय. टी. आय. धारक कौशल्य योजना २००९ रोजी आणली. भूमिपुत्रांना प्रशिक्षणाची विशेष सोय उपलब्ध करून दिली. मात्र ही योजना २०१६ पर्यंत व्यवस्थित झाली.
www.konkantoday.com