सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले २७ बंगले प्रशासनाने जमीनदोस्त केले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले २७ बंगले हटविण्यात यावेत, अशी नोटीस बंगले मालकांना देऊनही त्यांनी ते बंगले पाडले नसल्याने अखेर मंगळवारी वन व महसूल विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत हे बंगले अवघ्या ७ तासांत जमीनदोस्त केले.भल्या पहाटे कमालीची गुप्तता पाळत ६ जेसीबींच्या साहाय्याने हे बंगले पाडण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून एवढी गुप्तता पाळण्यात आली होती की, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले होते. आता परिसरात असलेल्या अन्य बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी विद्या घोडके यांनी सांगितले, आंबोली हिरण्यकेशी परिसरात सर्व्हे नंबर २३ मध्ये उभारण्यात आलेल्या २७ बंगल्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. गेले २० दिवस ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उपोषण, आंदोलन केले होते. त्यानंतर स्थानिकांचा वाढता दबाव लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाकडून ते बंगले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.www.konkantoday.com