
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने “शाळाबाहेरील शाळा” या उपक्रमाचा शुभारंभ
मार्च २०२० पासून सर्वत्र कोविड चा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे सन २०२० -२१ चे शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु झालेले नाही. शाळा कधी सुरु होतील याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. यावर उपाययोजना म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतू तांत्रिक अडचणी व आपल्या जिल्हाची भौतिक अवस्था यामुळे इंटरनेट सुविधा सर्व ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. म्हणून ऑनलाइन शिक्षणासाठी येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता प्रथम संस्था व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “शाळेबाहेरील शाळा” उपक्रमात जि.प.शाळा नारशिंगे या शाळेतील शिक्षक श्री.जाजनुरे सर व श्री.दुधाळे सर त्यांचे अनमोल योगदान देतच आहेत तसेच एक व्यापक मोहीम राबविण्याच्या दृष्टीने सहभागी होण्याचे गावातील सुशिक्षित तरूणांना आवाहन केले होते .त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने “शाळाबाहेरील शाळा” या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी संपन्न झाला.या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठान तर्फे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.या उपक्रमासाठी प्रतिष्ठान तर्फे मुलांच्या मार्गदर्शनासाठी श्री.समीर गोताड,श्री.गणेश कांबळे, श्री.संगम धावडे,श्री.सुदीप पवार आणि निलेश कलंबटे यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली.याप्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.सुनिल धावडे,सचिव श्री.समीर गोताड,प्रवक्ता श्री.संगम धावडे,संघटक श्री.समीर धावडे,सदस्य श्री.निलेश कलंबटे,राहुल धावडे,विजय धावडे इत्यादी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com