रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीच्या घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम करून राऊत यांना तिसर्या वेळी प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार केल्याचे माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी सांगितले.माळनाका येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी खा. राऊत यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन रविंद्र माने यांच्या हस्ते संपन्न झाले. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे राऊत यांना प्रचंड मताधिक्क्य मिळवून देण्याची ग्वाही श्री. माने यांनी दिली. उमेदवारी जाहीर झाल्याने आघाडीतील घटक पक्षांसमोर फक्त काम करण्याचे आव्हान शिल्लक राहिले आहे. घटक पक्षांतील मित्रपक्ष प्रामाणिकपणे प्रचार करून विनायक राऊत यांना तिसर्या वेळी लोकसभेत पाठवतील. खा. राऊत यांना तिसर्या वेळी लोकसभेत पाठवतील. खा. राऊत यांच्या विजयाची हॅटट्रीक ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.आमदार डॉ. राजन साळवी, माजी आमदार डॉ. सुभाष बने, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, मिलिंद कीर, अभिजित हेगशेट्ये, कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कीर, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, दीपक राऊत, प्रदेश सचिव श्रीमती रूपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. अश्विनी आगाशे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. नेहा माने, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, तालुकाध्यक्ष ज्योतीप्रभा पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख जगदीज राजापकर, राजापुरचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, सोमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप उर्फ बंड्या बोरूकर, विश्वास फडके, चिपळूण तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, प्रशांत साळुंखे, माजी जि.प. अध्यक्ष उदय बने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रविंद्र माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.www.konkantoday.com