रत्नागिरी जिल्हा जिल्हा बँक संचलित शिरगाव विकास सोसायटीत कॉमन सर्व्हिस सेंटर कार्यान्वित
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शिरगांव विकास सोसायटीत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) कार्यान्वित झाले आहे.सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते सेंटरचे उदघाटन झाले. सहाय्यक निबंधक सौ. पायल आंबेकर, जिल्हा बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक संदीप तांबेकर, सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद शिंदे, बँकेचे व्यवस्थापक नरेश जाधव, सोसायटीचे पदाधिकारी, सचिव रविंद्र सनगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोसायटीच्यावतीने चेअरमन प्रल्हाद शेट्ये यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. www.konkantoday.com