
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळालेल्या नर बिबट्या अखेर जेरबंद
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळालेल्या नर बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. पुणे पालिका प्रशासनाने वन विभागाच्या मदतीने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याच्या हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह खाद्य टाकून 9 पिंजरे लावण्यात आले होते. अखेर तो एका पिंजऱ्यात अडकला.
सविस्तर माहिती अशी, की कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा बिबट्या काल (दि. 04) पसार झाला होता. एक दिवस उलटूनही त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे संग्रालय कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. तो संग्रहालयाच्या विविध कॅमेरातून दिसत होता. त्यामुळे तो उद्यानाबाहेर गेला नाही हे मात्र ठाम होते.
बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या शोधमोहिमेला यश आले आहे.
www.konkantoday.com