दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्री देवी कुणकेश्वराच्या भेटीसाठी सहा देवस्वार्या येणार
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असणार्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा ८ ते १० मार्च या तीन दिवसासाठी असून १० मार्चला अमावास्या तीर्थस्थानाचा योग आला आहे. श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी जिल्ह्यातील सहा देवस्वार्या येणार आहेत. यावर्षी भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी बॅरिकेटींग व्यवस्था करण्यात आली आहे. तर अपंग व वयोवृद्धांना स्वतंत्र दर्शन रांगा असणार आहेत, अशी माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके, खजिनदार अभय पेडणेकर, संचालक अजय नाणेरकर, संजय आचरेकर, विजय वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते. श्री. लब्धे यांनी यात्रा नियोजनाबाबत माहिती देताना तीन दिवस महाशिवरात्रीची यात्रा कुणकेश्वर येथे होत आहे. रविवारी १० मार्चला अमावास्या तीर्थस्नानाचा योग आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांचा ओघ वाढणार आहे. www.konkantoday.com