जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी 363 नोंदी**-उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे**रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुणबी- मराठा, मराठा-कुणबी या 363, तर कुणबी 5 लाख 30 हजार 51 अशा एकूण 5 लाख 30 हजार 414 आतापर्यंत आढळलेल्या नोंदीची संख्या आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

03 नोव्हेंबर 2023 पासून विविध विभागांच्या कागदपत्रांच्या पडताळणीत सर्वात जास्त जिल्हा परिषद विभागात या नोंदी आढळलेल्या आहेत. कुणबी -मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित करणेबाबत उपविभागीय अधिकारी यांचे कडून कार्यवाही सुरू आहे. मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी 10 नोडल अधिकारी, 10 सहाय्यक नोडल अधिकारी, 4300 प्रगणक, 20 प्रशिक्षक आणि 271 पर्यवेक्षक यांच्यामार्फत 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 4 लाख 50 हजार 441 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाबाबत 2 दिवस प्रशिक्षणही घेण्यात आले होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button