
वाटद येथिल प्रस्तावित एमआयडीसीत स्थानिक व परप्रांतीय असा नवा वाद
वाटद येथे होणाऱ्या प्रस्तावित एमआयडीसीमधील येणारी जागा परप्रांतीयांनी आधीच खरेदी केली असल्याचा आरोप वाटद ग्रामस्थांनी केला आहे.जयगडमधील वाटद येथे प्रस्तावित एमआयडीसी होणार असून स्थानिकांना अंधारात ठेवून परप्रांतीय गुंतवणूकदारासाठी हा प्रकल्प आणत असल्याचा आरोप आता स्थानिक लोक करीत आहेत. परप्रांतीय गुंतवणूकदारानी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने वाटद मधील जमीन खरेदी केल्या आहेत. आता हेच लोक या जमिनी पाचपट मोबदला घेऊन शासनाला हस्तांतरित करतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा एक प्रकारे घोटाळा असून याची ईडीमार्फत चौकशी करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
www.konkantoday.com