
जिल्ह्यातील वातावरण बदललले पुन्हा काही प्रमाणावर थंडी
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात मोठे चढ उतार पहायला मिळाले. मात्र मंगळवारच्या नोंदीनुसार जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. यामुळेच जिल्ह्यात दिवसा उन्हाच चटका काहीसा कमी झाला असून रात्रीपासून पहाटे ते अगदी सकाळपर्यंत चांगलाच गारठा अनुभवायला मिळत आहे.भारतीय वामान शास्त्र, पुणे विभागाच्या दैनंदिन हवामान वृत्तानुसार मध्यप्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा व अंतर्गत कर्नाटकमार्गे उत्तर तामिळनाडूपर्यंतचे द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. यामुळे आता कोकणासह गोव्यात ६ ते ११ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. www.konkantoday.com