चिपळुणातील मुख्य जलवाहिनीला गळती, शहराचा पाणीपुरवठा खंडीत

चिपळूण तालुक्यातील खेर्डी-माळेवाडी येथून आलेल्या व खेड येथील साठवण टाकीत जाणार्‍या नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे सोमवारपासून तिच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे अर्ध्या शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे.संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याची नगर परिषदेने खेर्डी-मळेवाडी व गोवळकोट येथे जॅकवेल बांधल्या आहेत. या दोन्ही जॅकवेल अर्ध्या-अर्ध्या शहराची तहान भागवतात. यातील खेर्डी जॅकवेल नागरिकांसाठी वरदान असून येथून नियमित व चांगला पाणीपुरवठघ होतो. तर गोवळकोट येथील जॅकवेलजवळ अनेकदा खाडीचे भरतीचे पाणी येत असल्याने नागरिकांना खारट व मचूळ पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांमधून कायम ओरड होताना दिसते. त्यामुळे यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपाय केला जात असून आता मुख्याधिकारी विशाल भोसले हे कायमचा उपाय करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button