खेड येथे आयोजित केलेल्या लायन्स क्लब ऑफ स्टारच्यावतीने झालेल्या स्पर्धेत अलिबागच्या श्रृती शिरसाटला लायन्स कोकण सुंदरीचा मुकुट

जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील लायन्स क्लब ऑफ स्टारच्यावतीने प्रथमच भरणे येथे आयोजित लायन्स कोकण सुंदरी स्पर्धेत अलिबागच्या श्रृती शिरसाट हिने लायन्स कोकण सुंदरीचा मुकूट पटकावला. अलिबागचीच सृष्टी पाटील उपविजेती ठरली.या स्पर्धेत पनवेलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. रत्नागिरी मुख्यालयातील पोलीस उपविभागीय अधिकारी राधिका फडके व येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले.स्पर्धेत महाडच्या खुशी भोईरने तृतीय क्रमांक पटकावला, उत्कृष्ट हेअरस्टाईल मयुरी भुवड, उत्कृष्ट मेकअप विनया चव्हाण, उत्कृष्ट वॉक निबंगाळकर, उत्कृष्ट सादरीकरण मृणाल रूमाडे, उत्कृष्ट स्माईल साक्षी देसाई, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस स्नेहा सिंग, उत्कृष्ट कॉस्च्युम विशाखा तोडणकर यांना गौरविण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button