कोट्यावधी रुपये खर्च करूनही २४ तास नव्हे तर दरदिवशी सुद्धा रत्नागिरीकरांना पाणी मिळणे मुश्किल

रत्नागिरी शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी शीळ धरणाच्या सुधारित पाणी योजनेसाठी कोट्यवधी खर्च करूनही निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने शीळ धरणात सध्या ४९ टक्के  एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे माान्सूनच्या आगमनापर्यंत रत्नागिरी शहरात दर सोमवारी व दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.शीळ धरणातील पाणीसाठा कमी झाला असून उष्ण तापमानामुळे होणार्‍या बाष्पीभवनामुळे पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे शहरवासियांना आतापासून काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. कारण पाणीपुरवठा करणार्‍या नगर परिषदेच्या शीळ धरणात सध्या १ मार्च २०२४ रोजी १८२८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा (६० टक्के) शिल्लक होता. गेल्या हंगामात मान्सूनवर अल निनोचा राहिलेला प्रभाव व झालेल्या कमी पर्जन्यमानाने पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी वाढत्या उन्हाळ्याच्या काळात तापमानातील चढ-उतार व त्यामुळे पाण्याच्या होणार्‍या बाष्पीभवनाचा वेग यावर या धरातील पाणीसाठा यावर पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रत्नागिरी शहराला दररोज १९ ते २० एलएमडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३०१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पण शीळ धरणात गेल्या फेब्रुवारीच्या मध्यावर २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. त्यामुळे हा पाणीसाठा पाहता आगामी काळासाठी शहरवासियांवर काटकसरीने पाणीवापर करण्याची वेळ येणार, याची शक्यता प्रशासनाने वर्तविली होती. गेल्यावर्षी म्हणजेच १ मार्च २०२३ रोजी शीळ धरणात १९५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता. तर आता १ मार्च २०२४ रोजी १.८२८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button